चित्रपट स्टुडिओ, टीव्ही नेटवर्क, स्टोरी-टेलर, गेम प्रकाशक आणि स्पोर्ट लीग हे मोबाइलवरील ग्राहकांशी जोडले जाण्यासाठी Tenor सोबत काम करत आहेत, ज्यामुळे पुढील गोष्टींसाठी पाठबळ मिळते:
आगामी Justice League या चित्रपटाच्या बहुप्रतीक्षित ट्रेलरची GIF दाखवण्यासाठी Warner Brothers ने Tenor ची मदत घेतली होती. ट्रेलर रिलीझ झाल्यापासून पाच दिवसांच्या आत Tenor ने Justice League च्या GIF आशयाचे ९ कोटीहून अधिक व्ह्यू आणि लाखो थेट शेअर जनरेट केल्याने, अत्यंत महत्त्वाच्या वेळी लोकांची गुंतवणूक वाढली.
Netflix मध्ये ट्यून-इन राहण्याचे आव्हान हे टेलीव्हिजनच्या पारंपरिक संकल्पनेपेक्षा पूर्णपणे वेगळे आहे. Netflix च्या शोच्या GIF या सहसा त्यांच्या रिलीझच्या काही आठवड्यांपूर्वी लोकप्रिय होतात. म्हणूनच त्याच्या Narcos, Narcos, Master of None, The Crown, तसेच विल स्मिथचा सहभाग असलेल्या आगामी चित्रपटासाठी Bright सातत्याने ट्यून-इन केले जाण्याचे प्रमाण वाढवण्याकरिता GIF वापरून लोकांमधील उत्सुकतेला उत्तेजन देण्यासाठी Netflix हे Tenor सोबत एकत्र काम करत आहे.
Billions या नवीन शोसाठी मौल्यवान Tenor इनसाइट चा फायदा घेत, Showtime ने अलीकडेच सिरीझच्या १० व्या वर्धापनदिनानिमित्त Dexter चा आशय यशस्वीरीत्या पुन्हा दाखवण्यासाठी Tenor सोबत सहयोग केला आहे. ट्रेंडिंग ऑन-एअर आशय शोकेस करण्याबरोबरच, जुन्या आशयाचा आधार घेऊन ग्राहकांची उत्सुकता पुन्हा जागृत करण्यासाठी GIF वापरण्याची योजना आखणे हा Tenor पार्टनर सक्सेस टीम चा प्रभावी गुणधर्म आहे.
Tenor हा सर्वात मोठा आणि सर्वात वेगाने वाढणारा मोबाइल GIF शेअरिंग प्लॅटफॉर्म असून ते दर महिन्याला २० कोटीहून अधिक अॅक्टिव्ह वापरकर्त्यांना सेवा देत आहे व २० कोटीहून अधिक दैनिक शोध विनंत्यांवर प्रक्रिया करत आहे. आमचे GIF कीबोर्ड अॅप हे iOS आणि Android या दोन्हींवर त्याच्या वर्गवारीमधील सर्वाधिक डाउनलोड केलेले अॅप आहे. तसेच आम्ही Apple iMessage, Facebook Messenger, WhatsApp, Google Gboard, Kik, LinkedIn, Touchpal आणि यांसारख्या इतर भागीदारांसोबत GIF शेअरिंगला समर्थन देतो.
Tenor चा भावनिक आलेख हे चार अब्ज स्वतंत्र शोध संज्ञांना त्यांच्याशी सर्वोत्तम पद्धतीने जुळणाऱ्या GIF शी मॅप करते. Tenor चा आशय भागीदार म्हणून आम्ही तुमच्या GIF ना परिणामकारक जुळणी इंजीनसोबत इंटिग्रेट करू आणि संबंधित शोध परिणामांमध्ये तुमचा आशय दाखवू, ज्यामुळे ग्राहकांना तो शोधणे, शेअर करणे व त्याचा आनंद घेणे सोपे होते.
Tenor चे भागीदार म्हणून तुम्हाला पुढील गोष्टीचा फायदा होईल:
Tenor पार्टनर सक्सेस टीम ही मोबाइल मेसेजिंगमध्ये ग्राहकांना गुंतवून ठेवण्याची क्षमता वाढवणारा GIF संबंधित आशय तयार करण्यासाठी आणि निवडण्यासाठी तुमच्यासोबत काम करेल. आम्ही तुमचा आशय आमच्या सिस्टीममध्ये इंजेस्ट करू आणि मोबाइल डिलिव्हरीसाठी तो ऑप्टिमाइझ करू. Tenor चा भावनिक आलेख तुमचा आशय संबंधित शोध संज्ञांवर मॅप करेल आणि आमचे २० कोटीहून अधिक वापरकर्ते कुटुंबासोबत व मित्रमैत्रिणींसोबत त्यांचे विचार आणि भावना व्यक्त करण्यासाठी योग्य GIF शोधतील, तेव्हा तो त्यांना दाखवेल.
पहिली पायरी: चला बोलू या! मोबाइल GIF शेअरिंग वापरून चाहत्यांची संख्या वाढवण्यास सुरुवात करण्यासाठी आता {ContactUsLink}.